पहूर येथे रंगला कीर्तन सोहळा

0

पहूर ता. जामनेर : ज्या हातात बंदूक असते तेथे त्यांच्याहातात होती वीणा तर जेथे ‘खाकी’ची वर्दी असते तेथे त्यांचे होते धीतर आणि सदरा । मुंडासे बांधलेले. जय जय रामकृष्ण हरि च्या तालावर पहूर पोलीस ठाण्यात दत्तजयंती निमित्त आयेाजित कीर्तन सोहळ्यात रंगले होते पोलीस कर्मचारी ह.भा.प निवृत्ती महाराज, बालपनापासूनच्या अध्यात्मीक ओढीमुळेच आपण हा छंद जोपासला असल्याचे त्यांनी सांगीतले. दत्तजयंती निमित्त पोलीस व्हॅन चालक देवकर यांच्या हस्ते सपत्नीक पुजा करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे. यांनी त्यांचा सत्कार केला. माजी पोलीस पाटील विश्‍वनाथ वानखेडे यांनी पोलीस ठाण्यातील दत्तमंदिराच्या स्थापनेचा इतिहास सांगीतला. यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामस्थांनी लाभ घेतला. पोलीस कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.