पहूर । जलसंपदामंत्री ना गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येथील मुस्लिम समाजातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी शनिवारी रात्री भाजपात प्रवेश केला आहे. आगामी पेठ ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेऊन हा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर पाटील यांच्या कार्यलयात हा प्रवेश करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जे.के.चव्हाण, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शे.सलीम शे.गणी, अॅड. एस.आर. पाटील, रामेश्वर पाटील, साहेबराव देशमुख, राजू पाटील, भैय्या पठाण, शे.सलीम शे.न्याज मोहम्मद, शे. रहीम शे. अजिज, यांच्यासह मुस्लिम समाजाचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेश करणारे कार्यकर्ते खालील प्रमाणे हारूण खाँ अशरफ खाँ,शे सलीम शे. कादर, शे.कलीम शे.गणी,निसार वाफ कुरैशी, अब्बू ईस्माइल तडवी, शे.रियाज शे.अजीज, शे.शाबीर शे.नबाजी, शरीफ शफी कुरैशी, शे.हमीद शे.इमाम आदी. सुत्रसंचालन अनिल रामराव पाटील यांनी केले. येत्या मार्चमध्ये पेठ ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. त्यामुळे आतापासूनच वातावरण निर्मिती केली जात आहे. शे.सलीम शे. गणी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज भाजपाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.