पहूर येथे रिक्षाचालकाची गळफास लावून आत्महत्या

0

पहूर – कसबेतील रहिवासी विजय रामदास थोरात (वय-४७) याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात अकस्मात म्रुत्यू ची नोंद करण्यात आली आहे. याघटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहिती नुसार मयत विजय रामदास थोरात हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. आर्थिक परिस्थिती जेमतेम होती.त्याच्यावर बँकेचे चे कर्ज होते. अशी माहिती मिळाली आहे. याला कंटाळून स्वतःच्या घराजवळील गुरांच्या गोठ्यात सोमवारी सकाळी साडेसहाच्या पूर्वी गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. पहूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पश्चात पत्नी एक मुलगा, मुलगी असा परीवार असून माजी सरंपच विनोद थोरात यांचा भाऊ आहे.गणेश थोरात यांच्या खबरीवरून पोलिसांत अकस्मात म्रुत्यू ची नोंद करण्यात आली आहे.