पहूर । शहरातील समर्थ विठ्ठल मंदिरात नुकतेच तांब्याच्या शिवलिंगाची ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत विधिवत स्थापना करण्यात आली. शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या प्रेरणेने श्रावण महिन्याच्या पवित्र शुभ पर्वावर दिनकर पवार यांच्या शुभहस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.
या प्रसंगी पुरोहित शिवाजी सुरडकर, विठ्ठल राऊत, विठ्ठल कोंडे, सुभाष नाथ, राजाराम जाधव, पुंडलीक क्षीरसागर, पुजारी भानुदास जाधव, जगन्नाथ तात्या धनगर यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांनी दर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.