पहूर । पहूर-वाकोद गट तसेच लोहारा-कुर्हाड गट पाळधी-लोढ्री गटासाठी निवडणुकीची पुर्वतयारीची पाहणी करण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी धावता दौरा काढला असतांना पहूर येथील जि.प.सदस्य राजधर पांढरे व बाबुराव घोंगडेसह कार्यकर्त्यांनी पहूर येथे प्रचार रॅलीत सहभाग असा आग्रह धरला. त्यानुसार जि.प. गटाचे उमेदवार अमित देशमुख व पं.स.उमेदवार आशाबाई शंकर जाधव यांच्या आग्रहानुसार या भागातील दौरे आटोपून पहूर येथे सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजपाची प्रचार रॅली काढण्यात आली. पहूर कसबे, पहूरपेठ गावातून रॅलीचे आयोजन झाल्यानंतर उपस्थितांचा व मतदारांचा उत्साह पाहून खा.रक्षाताई खडसे यांनी समाधान व्यक्त केले.
मतदारांसमोर मांडला केलेल्या कामांचा आढावा
खासदार खडसे म्हणाल्या की, तालुक्याच्या विकासाची धुरा भाजपाच्याच हातात राहली असून यासाठी जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रयत्न केले आहेत. यावेळी त्यांनी कामाचा आढावा मतदारांसमोर मांडून उमेदवारांना भक्कम मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले असून तालुक्यातील दोन महत्वाचे प्रश्न त्यात पी.जी. रेल्वेचे ब्रॉडगेज तसेच बर्हानपुर-औरंगाबाद देवून या रॅलीला संबोधित केले. यावेळी भाजपाचे तालुक्यातून असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यात वाकोद येथील महेश देशमुख, जय पांढरे, सुरेश जोशी यांचेसह बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, अरविंद देशमुख, वासुदेव घोंगडे, भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रचार रॅलीमध्ये आजुबाजूच्या गटामध्ये प्रचार सभा घेण्याचा आग्रह असल्यामुळे रॅलीचे आयोजन पाळधी-लोंढ्री गटातून जि.प.चे उमेदवार विजया समाधान पाटील व पं.स.साठी निताताई कमलाकर पाटील यांच्या प्रचारार्थ करण्यात आले होते. तसेच शेंगोळा येथे बाबुराव घोंगडे व राजधर पांढरे यांच्या प्रचारसभेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.