पहेलवान पूत्र ग्रुपच्या शाखेचे दीपनगरसह मुक्ताईनगरात उद्घाटन

0

संपूर्ण महाराष्ट्रात शाखा उघडण्याचा मानस -माजी नगरसेवक संतोष बारसे

भुसावळ- पहेलवान पुत्र ग्रुपच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करावयाच्या असून या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांचे संघटन करण्यात येईल तसेच विविध स्तरावरील प्रश्‍न सोडवू, असा विश्‍वास माजी नगरसेवक तथा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारसे यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते भुसावळ तालुक्यातील दीपनगर-निंभोरा तसेच मुक्ताईनगर येथे शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. बारसे म्हणाले की, गावा-गावात शाखा उघडण्यासाठी तरुणांकडून प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात विविध उपक्रम शाखांचे माध्यमातून राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. निंभोरा येथील कार्यक्रमास राहुल झगडे, दीपक हतोले, गब्बर चावरीया, अमित खरारे, प्रदीप करोसिया, अतुल थोरात, योगीराज सोनवणे, रमेश गायकवाड, विजय धांडे आदींसह आयोजक तथा शाखाध्यक्ष अमो सावडे, विजय बशीरे, रीतेश पाटील व सदस्य उपस्थित होते. मुक्ताईनगर येथे शाखा फलकाचे अनावरणप्रसंगी दीपक हतोले, गब्बर चावरीया, विशाल पवार, अमित खरारे, सागर पारोचे, प्रदीप करोसीया, विजय बशीरे, अतुल थोरात आदींची उपस्थिती होती.