पांझरा चौपाटी वाचवण्यासाठी पोलीस अधिक्षकांना निवेदन

0

धुळे । शहराची शान असलेली धुळे शहरातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणजे धुळे शहर नागरिकांच्या हक्काची पांझरा चौपाटी पाडण्यासाठी राष्ट्रवादी,शिवसेना प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत चौपाटीवरील हॉकर्स यांनी चौपाटी पाडणे रोकण्यासाठी पोलीस अधिक्षक एस. चैतन्या यांना निवेदन सादर केले. पांझरा चौपाटीवर असंख्य कुटूंबाचा उदरनिर्वाह आहे. परंतू राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी व इतर पदाधिकारी तसेच तथाकथीत पत्रकार योगेंद्र जुनागडे यांच्या तक्रारीवरून 9 ते 10 मार्च दरम्यान प्रशासनातर्फे चौपाटी पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. तरी चौपाटी वाचवविण्यासाठी आ. अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकर्सतर्फे आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.