पांझरा नदीकाठावरील रस्त्याचे काम जून पुर्वी होणार

0

धुळे । शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या पांझरा नदीच्या दोन्ही काठांवर साडेपाच-साडेपाच कि.मी.लांबीच्या रस्त्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरु असून 30 जून पुर्वीच हे काम पुर्ण व्हावे म्हणून या कामावर विशेष लक्ष दिले जात आहे. प्रभातनगर ते पारोळारोड असा सरळ रस्ता होणार असून पांझरा नदीवर पूर्ण उंचीचा पूल कम बंधारा उभारला जात आहे. या बंधार्‍याच्या पाण्याच्या फुगवटा मोठ्या पुलापर्यंत पोहचार आहे. गणपती मंदीर पुलाच्या बाजूस एक स्वतंत्र नव्याने बंधारा बांधून तेथे पाणी अडविले जाईल. भगवान शंकराच्या जटेतून गंगा बाहेर पडते आहे, असे दृश्य प्रत्यक्ष साकारले जाणार असल्याचे आमदार गोटे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. बंधार्‍यापासून 30 मीटर अंतरावर पांझरानदीच्या मध्यभागी 30 फूट उंचीवर एक 75 बाय 75 मी.एवढ्या मोठा प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे.

भगवान शंकराची मूर्ती
प्लॅटफॉर्मवर एका वेळेस 4 हजार व्यक्ती बसू शकतील. प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी 23 फूट उंचीची भगवान शंकराची ब्राँझ धातूतील मूर्ती उभारली जाईल. प्लॅटफॉर्मवर जाण्याकरीता गणपती मंदीराकडून एक तसेच प्रमोद मोराणकर यांचे घर किंवा मराठा मंगल कार्यालयाच्या देवपूर बाजूने एक अशा झुलत्या पुलाने नागरीकांना प्लॅटफॉर्मवर भगवान शंकराची मुर्तीपर्यंत पोहचता येईल. येथे 12 महिने वाहते पाणी असेल. साठवलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात कमळाच्या फुलांची लागवड करून जास्तीत जास्त आकर्षक व सौंदर्याने ओपप्रोत अशा स्थळाची निर्मिती केली जाईल.

साडेसात कोटी मंजूर
प्रमोदनगर ते गवळीवाडा असा ब्रिज कम बंधारा यापूर्वीच बांधून पूर्ण करण्यात आला आहे. थोड्याफार फरकाने पांझरा नदीत वर्षभर पाणी असेल अशी आखणी करण्यात आली आहे. शासनाने साडेसात कोटी रूपयांचा निधी मंजुर केला असून निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.