पांडुरंग पालखीचे भुसावळात आगमन

0

भुसावळ। मुक्ताईनगरात संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याची तयारी पुर्ण झाली आहे. संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्त पंढरपूरहुन पांडुरंगाच्या पादुका पालखी निघाली आहे. शनिवार 20 रोजी सायंकाळी 7 वाजता पालखीचे भुसावळ शहरात आगमन झाले.

रविवारी सकाळी पालखी मुक्ताईनगरकडे रवाना होणार आहे. संत मुक्ताबाई यांच्या 720 व्या अंतर्धान समाधी सोहळ्या निमित्त श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समिती आणि कोथळी- मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थान यांनी पंढरपूर ते मुक्ताईनगरपर्यंत पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या पालखीचे आगमन झाले असता नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पूजन करुन दर्शन घेतले. यावेळी अ‍ॅड.रविंद्र पाटील, नितीन धांडे यांसह भाविकांची उपस्थिती होती.