राजकोट । 5 नोव्हेंबर हा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा वाढदिवस. रविवारी 5 नोव्हेंबरला त्याने आपला 29 वा वाढदिवस साजरा केला. न्यूझीलंड विरूद्ध दुसर्या टी 20 क्रिकेट सामन्यात पराभव झाल्यानंतर, भारतीय संघातील खेळाडूंनी कर्णधाराचा वाढदिवस जोरदार साजरा केला. भारतीय संघात एक अनोखी परंपरा सुरू झाली आहे, ज्याचा वाढदिवस असेल त्याला केकने रंगवून टाकणे. ही परंपरा कर्णधारावरही चांगलीच लागू पडली आहे. सर्वात आधी विराट कोहलीच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला, त्याच केकने विराट कोहलीला त्याच्या साथीदारांना रंगवले.
फिटनेस राखण्यासाठी हे आहे विराटचे डाएट
1988 मध्ये जन्मलेला विराट हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटर्सपैकी आहे. क्रिकेटचा देव समजला जाणार्या सचिन तेंडुलकरला निवृती घेताना तुझे विक्रम कोण तोडू शकेल ? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सचिनने विराट कोहलीचे नाव घेतले होते. विराटच्या आक्रमक खेळीचा अंदाज आपल्याला प्रत्येक सामन्यामधून येत असतो. नयमित व्यायाम तसेच प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार विराट आहार घेत असतो.
ब्रेकफास्ट
आमलेट, काळी मिर्ची बर्याचदा मासे, मटण, पपई आणि टरबूज फॅट्ससाठी एक्सट्रा चिज हॉटेलमध्ये असला तरीही ब्रेड बटर विराटसोबतच ठेवतो.
लंच
ग्रिल्ड चिकन आणि ग्रिल्ड फिश उकडलेले बटाटे, पालक आणि भाजी मसल्स वाढण्याससाठी रेड मीट विराट कोहलीचे डिनर फक्त सी-फूड.