पाऊस नसल्याने बळीराजाला तिबार पेरणीचा फेरा

0

शहादा। तालुक्यात पावसाच्या हुलकावणीमुळे कही खुशी कही गम परीस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागात समाधानकारक पाऊस पडला असुन आजतागायत शेतकर्‍यांची शेतातील पिके ठीक आहेत.मात्र तालुक्याचा पुर्व व दक्षिणेकडील भागात अजून समाधानकारक पाऊस नाही त्यामुळे या परीसरात शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट आले आहे.तालुक्यात जून महिन्याच्या 10 तारखेला पावसाने हजेरी लावली होती. त्यातही वरूण राजाने दुजाभाव केल्याचे जाणवते. पश्चिम भागात समाधानकारक पाऊस व पुर्वभागातील मंदाणे, असलोद, कवळीद,चांदसैली व परीसरात तुरळक पाऊस त्यातही शेतकरी समाधानी होऊन बी – बियाणे आणून शेतात मूंग,उडीद,ज्वारी,कपाशी,मका आदी पिकांचा पेरा केला.

पावसाची 12 दिवसाची दडी
मात्र पेरणी केल्यानंतर पावसाने 12 दिवसाची दडी मारल्यामुळे पेरा केलेले बियानांना फुटलेला अंकुर जमिनितच विझला. नंतर जून अखेरीस पूर्व भागात जोरदार पाऊस झाला. त्यात शेतकर्‍यांनी पहिला पेरा सोडून पुन्हा नव्याने दुबार पेरणी केली. दुबार पेरणीनंतर पाऊस चांगला झाल्याने पिक जमीनीच्या वर येऊ लागली. ते पाहुन शेतकरी आनंदित होता. मात्र पुन्हा पावसाने दांडी मारल्याने पिकांची दयनीय अवस्था होऊ लागली आहे. या परीसरातील शेतकर्‍यांना आता तिबार पेरणीला सामोरे जाण्याची वेळ येउन ठेपली आहे. तालुक्यात अजून दमदार पाऊस नाही.पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे त्यातच शासनाने दिलेल्या कर्जमाफ़ीतून कोणतीच आशा दिसत नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत दिसत आहे.