नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत. पाकिस्तानात विराट कोहलीचे चाहते इतके आहेत की त्यांनी चक्क पाकिस्तानी किकेटपटूलानाकारत विराटला पसंत केलं आहे. नुकतेच झालेल्या जागतिक संघ आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानी चाहत्यांनी विराट कोहलीला खूपच मिस केलं. ज्या घटनेसंदर्भात बोलत आहोत त्याचा संबंध एका ट्विटशी आहे.
हे ट्वीट पाकिस्तान मेमेज नावाच्या अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये प्रश्न विचारला आहे की, पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद आणि विराट कोहली यांच्यात कोण चांगला फलंदाज आहे? तसेच अहमद शहजादसाठी रिट्विट करा आणि विराटसाठी लाईक करा असेही म्हटले आहे. या प्रश्नानंतर आलेला निकाल पाकिस्तानसाठी धक्कादायक होता. कारण, 95% (पाकिस्तानी) नागरिकांनी विराट कोहलीला चांगला फलंदाज असल्याचे म्हटलं आहे.एका ट्विटर यूजरने म्हटलं आहे की, नशीब पाकिस्तानच्या नागरिकांना इतकी तरी अक्कल आहे. सर्वांना माहिती आहे की कुठलीच तुलना नाहीये, कोहली महान आहे.