लंडन । पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इम्रान खान याने पाकसंघाच्या पराभवावर आपली नाराजी व्टिटरच्या माध्यमातून व्यक्त केली. त्याने लिहले की, भारताचा एकतर्फी विजय झाला. पाकिस्तानचा चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील हा पराभव वेदानादायी होता. खिलाडूवृत्तीची मला जाणीव आहे. त्यामुळे विजय आणि पराभव हा खेळाचा भाग असतो हे मला मान्य आहे. पण पाकिस्तानने भारताविरुद्ध संघर्ष न करता पराभव पत्करला. त्यामुळे हा पराभव वेदना देणारा असाच होता. पराभवानंतर इम्रान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.