जसलमेर: राजस्थानमधील जसलमेरमधून एका भारतीय जवानाला अटक करण्यात आली आहे. भारतीय सैन्यासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप या जवानावर आहे. महिला एजंटच्या जाळ्यात अडकलेल्या जवानाने व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर या जवानाला अटक करण्यात आली. या जवानाला चौकशीसाठी जयपूरला नेण्यात आले आहे.
राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्र यांनी या माहितीला दुजोरा दिला. सोमवीर असे या जवानाचे नाव आहे.
पाकिस्तानमधील एका महिलेने जवानाला हनी ट्रॅप केल्याची माहिती लष्कर आणि पोलिसांनी मिळाली होती. सोमवीर या महिलेला सैन्याशी संबंधित गुप्त माहिती पुरवत होता. सोमवीर या महिलेला प्रशिक्षणादरम्यान भेटल्याची माहिती चौकशीतून समोर आली.