पाकला 237 धावांचे आव्हान

0

कार्डीफ । श्रीलंका व पाकिस्तान या दोन्ही संघाना उपात्य फेरीत प्रवेश करण्यासाठी विजय मिळविणे आवश्यक आहे. आज नाणेफेक जिकून पाकिस्तानने श्रीलंकेला फलंदाजीला पाचरण केले. श्रीलंकेचे सलामीवीर निरोशन डिकवेला ,धनुष्का गुनाथिलका,मैदानावर आले. दोन्ही फलंदाजानी लंकेला चांगली सुरवात देण्याच प्रयत्न केला.या प्रयत्नात 6 षटकाच्या पहिल्याच चेडूवर धनुष्का गुनाथिलका हा 13 धावांवर बाद झाला.तर निरोशन डिकवेला याने एकाकी संघर्ष करित संघाची धावसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करतांना दिसला.मात्र तो ही वैयक्तिक 73 धावांवर असतांना बाद झाला तो श्रीलंकेला सर्वात मोठा धक्का बसला.कर्णधार एंजेलो मैथ्यूज (39) ,असेला गुणारत्ने(27),सुरंगा लकमल (26) यांना धावा केल्या या शिवाय कोणताही श्रीलंकेचा फलंदाज हा दोन आकडी धावसंख्या काढू शकला नाही.पाक कडून गोलंदाजी करतांना मोहम्मद अमिर 2,जुनैद खान 3,फहीम अशरफ 2,हसन अली 3, यांनी गडी बाद केले तर इमाद वसीम,मोहम्मद हाफिज यांना एकही गडी बाद करता आलेला नाही.

पाकने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाक गोलंदाज श्रीलंकेला मोठी धाव उभी करू देणार नाही असे सामन्या दरम्यान चित्र उभे राहिले होते.मात्र सुरंगा लकमल ,असेला गुणारत्ने यांच्या सयंमी फलंदाजीमुळे 167 -7 अशी धाव संख्या असतांना ती दोनशे पार नेली श्रीलंकेच्या फलंदाजानी.लंकेच्या सलामीवीर निरोशन डिकवेला ,धनुष्का गुनाथिलका हे मैदानावर आले. दोघांनी मोठी धाव संख्या निर्माण करण्याच्या इराद्योन फलंदाजी करित असतांनाच श्रीलंकेला पहिला धक्का सहाव्या ओव्हरमध्ये बसला.

धनुष्का गुणातिलक (13) जलदगती गोलंदाज जुनैद खानच्या चेंडूवर शोएब मलिककरवी झेलबाद झाला. कुशल मेंडिसला (27) हसलने त्रिफळाचीत करित दुसरी विकेट 82 धावांवर काढली. यानंतर दिनेश चांडिमल फहीमच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला.लंकेची 83 धावांवर 3 गडीबाद अशी अवस्था असतांनाही डिकवेला एकाकी धाव काढीत होता. त्याच्या जोडीला कर्णधार अँजेलो मॅथ्यूज साथ देत होता.मात्र 32व्या ओव्हरमध्ये मॅथ्यूज (39)ला मोहम्मद आमिरने बाद केले.हा अजुन एक धक्का लंकेला बसला. यानंतर धनंजय डिसिल्व्हा 1 धावेवर बाद झाला. एकाकी धावा संख्या वाढविण्याचा प्रयत्न करणारा निरोशन डिकवेला या 73 धावावर आमिरने झेलबाद केले.हा श्रीलंकेला दुसरा सर्वात मोठा धक्का होता. थिसारा परेराला 1 धावेवर जुनैद खान याने झेलबाद केले तर सुरंगा लकमल याल हसन अली ने त्रिफळा उडविला. नविन प्रदिप याला अशरफ याने स्वत: झले बाद केले. लथिश मलिंगा हा 9 धावांवर नाबाद राहिला.

श्रीलंका- निरोशन डिकवेला ,धनुष्का गुनाथिलका,कुशाल मेंडिस,दिनेश चंडीमल,एंजेलो मैथ्यूज (कप्तान),धनंजय डी सिल्वा,असेला गुणारत्ने, थिसारा परेरा,सुरंगा लकमल , लसिथ मलिंगा, नुवान प्रदीप.

पाकिस्तान- सरफराज अहमद (कप्तान/विकेटकीपर), अजहर अली, फखर जमान, बाबर आजम, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, इमाद वसीम, फहीम अशरफ, मोहम्मद आमिर, हसन अली और जुनैद खान.

निरोशन डिकवेलची एकाकी झुंज
दोन्ही संघांनी पहिले सामने हरल्यानंतर मोठे उलटफेर केले आहेत. तथापि, हा सामना जिंकणारी टीम सरळ सेमीफायनलमध्ये जाणार.पाकिस्तान शादाब खानच्या जागी गोलंदाज फहिम अश्रफला घेतले तर श्रीलंकेनेही कुशल परेराच्या जागी धनंजय डिसिल्व्हाला संघात संघात घेतले. या सामन्यात लंकेकडून डीकवेला यांने सर्वअधिक 73 धावा काढल्या. या सोडल्या असता कोणीही मोठी धाव संख्या उभी करु शकला नाही.