लंडन । पाक संघाचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रीदी चॅम्पियन ट्रॉफीत पाकिस्तान विरूध्द सामन्यात भारताला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले आहे. आफ्रिदी म्हणाला की, रविवारी होणार्या चॅम्पियन ट्रॉफिमध्ये भारत विरूध्द होणारा सामना रोचक सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघाचे पारडे जड आहे. आफ्रिदीने म्हणाला की, एक पाकिस्तान संघाचा जबरजस्त समर्थक म्हणून मला ही वाटेल की माझा संघ कोणत्याही संघाविरूध्द खेळतांना जिकला पाहिजे.त्यातल्या त्यात भारत विरूध्द असलेल्या सामन्यात ही, वास्तविक आताचा ईतिहास व भारतीय संघा याचा विचार केला असता या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे.तो हे म्हणाला की, पाकिस्तानी गोलंदाजांना भारताच्या मजबुत फलंदाजीविरूध्द आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावे लागले. कोहलीच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय संघाची फलंदाजीचा क्रम हा सर्वोत्कृष्ट आहे. तो कोणत्याही गोलंदाजांचा फज्जा उडवू शकतात. कोहलीच्या अग्रक्रमातील फलंदाजीबद्दल सर्वांना माहित आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात काही सर्वोत्कृष्ट पारि खेळला आहे.
चांगले गोलंदाज भारतीय संघात
2012 मध्ये एशिया कप मध्ये पाकिस्तान विरूध्द खेळतांना त्याने खेळलेली शतकी पारी आजही आठवतो. जेव्हा की एडिलेडमध्ये आईसीसी क्रिकेट विश्व कप 2015 मधील सामन्यात तो सर्वोकृष्ट राहिला आहे. मला नेहमी कोहलीसाठी गोलंदाजी करणे डोकेदु:खी राहिली आहे. त्याच्याविरूध्द पाकिस्तानी गोलंदाजांना सर्वोश्रेष्ठ गोलंदाजी करावी लागणार आहे. पाक संघाला आक्रमक होण्याची आवश्यकता आहे. जेव्हा क्रिजवर कोहली असेल.पाकिस्तान संघ कोहलीला लवकर आऊट करण्यात यशस्वी झाले तर भारताला कमी धावसंख्येवर बाद करण्याची आशा वाढून जाईल.भारताची जमेची बाजु मजबुत फलंदाजी राहिली आहे. ती पारंपारिक मजबुत बाजु राहिली आहे.गोलंदाजीत आक्रमण संतुलित आहे. आश्विन याच्या नेतृत्वाखाली चांगले गोलंदाज भारतीय संघात सहभागी झाले आहे.