पाकिटासह सापडलेली रक्कम केली परत

0

भुसावळ । येथील शिवसेनेचे विभागप्रमुख उमाकांत शर्मा यांनी पैशाने भरलेले व महत्वपूर्ण कागदपत्र असलेले सापडलेले पाकिट संबंधित व्यक्तीला शोधुन परत करून आपल्या जबाबदारी व कर्तव्याची प्रचीती दिली. स्थानिक गुजराथी हॉटेल समोरुन 5 रोजी सायंकाळी 6 वाजेचे सुमारास जात असताना शिवसैनिक उमाकांत शर्मा यांना रस्त्यावर कोणाचे तरी एक पाकिट पडलेले आढळले. शर्मा यांनी सदर पाकिट कोणाचे आहे का याबाबत बराच वेळ परिसरात चौकशी केली मात्र पाकिटासाठी कोणीच पुढे आले नाही. तेव्हा शर्मा यांनी पाकिटात असलेल्या आधारकार्ड व पॅनकार्डच्या मदतीने तपास केला.

पाकिट येथील रेल्वेत कार्यरत टिकिट तपासनीस बी.पी. सिंग यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून शिवसैनिक उमाकांत शर्मा यानी सिंग यांचे स्वाधीन पाकिट केले. पाकिटामधील रोख रक्कम बघून कोणाचीही नियत फिरली असती मात्र ईमानदारी, जबाबदारी व कर्तव्यदक्षतेचे भान राखल्याचे मत सिंग यांनी व्यक्त करीत उमाकांत शर्मा यांचे कौतुक करून आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र माखिजानी, तिकीट तपासणीस चुन्नीलाल आदी उपस्थित होते.