नवी दिल्ली – पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार करण्यात आला याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनी गोळीबार केला यात पाकिस्तानच्या 3 जवानांना ठार करण्यात यश आले आहे. नियंत्रण रेषेवरील रावलकोट सेक्टरमध्ये भारतीय लष्करी जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबारात प्रत्युत्तर दिले.
शाहपूर, किरनी, कस्बा, मंधार, माल्टी या भागात भारताकडून पाकिस्तानी सैन्यांना लक्ष्य करण्यात आले. अनेक दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमाभागात गोळीबारी सुरु आहे. भारताच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय लष्कर आणि सामान्य नागरिकांवर गोळीबार सुरु होता. यात अनेक सामान्य नागरिक जखमी झाले. सोमवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून मनकोट आणि पुंछ सेक्टरमध्ये सामान्य नागरिकांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात येत आहे. यामध्ये 4 लोकं जखमी झाले असून नजीकच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराने एलओसीवर पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांना टार्गेट करण्यात आलं.यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती मिळाली आहे. पुंछ सेक्टरमध्ये काल पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय जवानांनी केला तेव्हापासून पाकिस्तानकडून सीमाभागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. सोमवारी सकाऴापासूनच पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेला लागून असलेल्या मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने शस्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात भारताचे पाच जवान जखमी झाले. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.