पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद !

0

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरील कुरबुरी वाढवण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, आज जम्मूमधील कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवान शहीद झाला आहे. शहीद जवानाचे नाव नाईक रवी राजन कुमार सिंह असल्याचे समोर आले आहे. आज मंगळवारी सकाळी नियंत्रण रेषेजवळी कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. या गोळीबारामुळे चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीमुळे नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने स्थानिक रहिवाशांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीला भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.