नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान पाकिस्तानने समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनी याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. समझोता एक्स्प्रेस भारत-पाकिस्तान दरम्यान चालणारी रेल्वे आहे. २२ जुलै १९७६ ही एक्स्प्रेस सुरु करण्यात आली होती. दोन्ही देशातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही रेल्वे सेवा सुरु करण्यात आली होती.