पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध

0

मुंबई – पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत भेंडी बाजार, डोंगरी या भागात पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी दिल्या. तसेच परिसरातील दुकानेही बंद करायला लावली.

शिवसेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळून घटनेचा निषेध केला. या प्रसंगी पाकिस्तानविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. कल्याण पूर्व आणि डोंबिवली येथे रिक्षा बंद करण्यात आल्या असून नागपूरमध्येही शिवसैनिकांनी टायर जाळून वाहतूक रोखली.