जम्मू : पाकिस्तान साठी भारतात येऊन हेरगिरी करणाऱ्या दोन हेरांना जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती राजवडी जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली आहे.
लष्कर पल्लेदरा चे काम करणारा एक जण व त्याचा नातेवाईक याला काश्मीर पोलिसांनी व लष्कर यांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर शनिवारी रात्री अटक केली.
या दोघांनी महत्त्वाची व संवेदनशील सुरक्षा यांचे व्हिडिओ बनवले व पैशाच्या बदल्यात देशाबाहेर पाठवले असा त्यांच्यावर आरोप आहे.