पाकिस्तानचे दिवस भरले? अमेरिकेकडून कानपिचक्या

0

न्युयॉर्क : पाकिस्तानने अन्य देशांशी संबंध ठेवताना किंवा राखताना, अतिरेकी जिहादींपेक्षा आपल्या देशात उपलब्ध असलेल्या मुत्सद्दी लोकांची बुद्धी वापरावी; अशा कानपिचक्या अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार मॅकमास्टर यांनी दिल्या आहेत. अफ़गाण वा भारतात पाकने आपल्या जिहादी हस्तकांत़र्फे चालवलेल्या घातपाती कारवायांमुळेच अलिकडे अमेरिकन सेनेला नांगरहार येथे जगातला सर्वात मोठा बॉम्ब टाकावा लागला होता. त्यात इसिसप्रमाणेच अफ़गाण तालिबान व अन्य जिहादी अड्डे उध्वस्त करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ताजा इशारा म्हणजे असाच बॉम्बहल्ला पाकवरही करायला मागेपुढे बघणार नाही, अशी तंबीच आहे.

अमेरिकेच्या अधिपत्याखाली अफ़गाण सरकार काम करीत असून, त्यात काड्या घालण्यासाठी घातपात घडवणार्या अफ़गाण तालिबानांना पाकिस्तानच छुपी मदत करीत असते. त्याखेरीज पश्‍चीम अफ़गाण प्रांतामध्ये हिंसाचार करणार्या हक्कानी नेटवर्कलाही पाकचाच आश्रय मिळालेला आहे. त्याच भागात अमेरिकेने अलिकडे दहा टन वजनाचा बॉम्ब ़फेकला होता. तो पाक सीमेपासून अवघा बारा किलोमिटर्स दुर धमाका करून गेला. मॅकमास्टर यांना सल्ला म्हणजे पाकभूमीत आश्रय घेतलेल्या तालिबान व अन्य जिहादी गटांना धडा शिकवण्यासाठी तिथेही असा हल्ला होऊ शकतो अशी़च तंबी आहे.

अफ़गाण असो किंवा अन्य शेजारी असोत, त्यांच्या बाबतीत पाकिस्तानने मुत्सद्देगिरी व समंजसपणाने काम करण्यातच त्या देशाचे भले आहे. पण पाक नेतृत्वाला त्याचे भान अजून आलेले नाही. जगाने सतत पाक नेतृत्वाकडे अपेक्षेने बघितले. पण त्यांना शहाणपण येण्याची कुठलीही चिन्हे दिसलेली नाहीत. इतक्या कडक शब्दात अध्यक्ष ट्रंप यांचे सुरक्षा सल्लागार मॅकमास्टर यांनी पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या आहेत..