नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकिस्तानची तिळपापड झाली आहे. संपूर्ण जगभरात भारताविरुद्ध खोटे प्रचार पाकिस्तान करत आहे. सगळीकडे निराशाच पदरी पडली आहे. आता पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर भारताविरोधात ११५ पानांचे डॉजिअर सादर करत बिनबुडाचे आरोप केले आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासमोर आपली बाजू मांडली. भारताने मानवाधिकारांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर बोलताना काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारताविरोधात बिनबुडाचे आरोप केले आहेत. काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी संयुक्त तपास समितीची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.