पाकिस्तानच्या एका विद्यापीठाने काढला असा विचित्र नियम

0

इस्लामाबाद-पाकिस्‍तानच्या बाहरिया विद्यापीठाने एक विचित्र आदेश काढला आहे. यानुसार, तरुण-तरुणींनी विद्यालयाच्या आवारात असताना एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेली याबबातची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या आदेशावर जोरदार टीका केली जात आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून आदेश योग्य असल्याचं सांगण्यात येत आहे.

सर्वत्र टीका 

आदेशानुसार, विद्यालयाच्या आवारात असताना तरुण-तरुणींनी एकमेकांमध्ये ६ इंच अंतर ठेवावे . नियमाचे पालन न करणाऱ्यांना दंड आकारला जाईल किंवा अनुशासनात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथील विद्यालयांमध्ये हा नियम लागू असेल. विद्यापीठाच्या या आदेशाविरोधात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ऑल पाकिस्‍तान युनिव्हर्सिटीज अॅकेडमिक स्‍टाफ असोसिएशन फेडरेशनने (FAPUASA) बाहरिया विद्यापीठाला पत्र लिहून आदेश तातडीने परत घेण्यास सांगितले आहे. मात्र, अद्याप विद्यापीठ प्रशासनाने आदेश परत घेण्याची तयारी दर्शवलेली नाही.