नवी दिल्ली: पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकाची उद्या मंगळवारी सुटका होणार आहे. हमीद अन्सारी असे या व्यक्तीचे नाव आहे. कोणत्याही कागदपत्रांशिवाय पाकिस्तानात घुसखोरी करुन हेरगिरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर खटलादेखील चालवण्यात आला. मात्र काही दिवसांपूर्वीच पेशावर उच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. हमीद यांची महिन्याभरात तुरुंगातून मुक्तता करा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले.