पाकिस्तानने 2-1 ने जिकली एकदिवसीय मालिका

0

वेस्ट इंडिज । वेस्ट इंडिज व पाकिस्तान याच्या तीन एकदिवसीय सामन्याची मालिका सुरू होती.हि मालिका पाकिस्तान संघाने 2-1 ने जिकली आहे.यात सामनावीर व मालिकावीर शोएब मलिक याला मिळाले.मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात वेस्टइंडिज संघाने नाणेफेक जिकून 9 गडी गमवून 233 धावा काढल्या.या धावांचा पाठलांग करतांना 43.1 षटकात चार गडी गमवून लक्ष्य पुर्ण केले.या सामन्यात सर्वात मोठी खेळी शोएब मलिक याने नाबाद 101 धावा तर मोहम्मद हफीज यान 81 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी फलंदाजी केल्यान 41 चेडू शिल्लक राखून 2-1 ने विजय मिळविला. पाकिस्तान संघाची एकावेळी अशी वेळी होती की 36 धावांवर तीन गडी बाद झाले होते.

मलिक व हफीज यांची शतकी भागेदारी
मात्र मलिक व हफीज याच्या शतकी भागेदारीमुळे पाकिस्ताने मालिका जिकली.मलिकने 111 चेडून 10 चौकार व दोन षटकार मारून नाबाद 101 धावा केल्या. मलिकचे एकदिवसीय सामन्यातील करीयरमध्ये 9 शतक बनविले.या खेळीमुळे सामनावीर व मालिका वीर पुरस्कार मिळाला. मलिक ने प्रथम हफीज बरोबर चौथ्या विकेटसाठी खेळतांना 113 धावा केल्या नंतर कर्णधार आणि यष्टीरक्षक सरफराज अहमद(नाबाद 24) याने पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली.हफीजने 86 चेडूत आठ चौकार व 2 षटकार मारून 81 धावा काढल्या.त्याने एकदिवसीय सामन्यातील 31 वे अर्धशतक काढले. सरफराज ने 26 चेडूत एक चौकारच्या सहय्याने नाबाद 24 धावा काढल्या.मागील सामन्यात शतक करणारा बाबर आजम ने केवळ 16 धावा काढून तंबूत परतला.वेस्ट इंडिज कडून शेनन गेब्रियल ने 60 धावा देवून दोन गडीबाद केले.जैसन होल्डर आणि एश्ले नर्श ला एक-एक गडी बाद केला.

यापुर्वी शाई होप (71) आरि जैसन मोहम्मद (59) च्या अर्धशतकामुळे वेस्टइंडिज संघाची धावसंख्या 9 बाद 233 वर पोहचली.होपने 112 चेडूत एक चौकार व दोन षटकार मारून 71 धावा काढल्या त्याचे पहिले एकदिवसीय अर्धशतक होते.तर मोहम्मदने 64 चेडूत पाच चौकार व दोन षटकर मारून 59 धावा काढल्या.मोहम्मदचे हे चौथे एकदिवसीय अर्धशतक होते.होप व मोहम्मदच्या चौथ्या विकेटसाठी 101 धावांची भागेदारी वेस्टइंडिज संघाला 233 धावापर्यंत पोहचविले. पॉवेल ने 23, वाल्टन ने 19 व एविन लेविस ने 16 धावा काढल्या.