मुंबई। भारत पाकिस्तान या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धा संघामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. प्रत्येक जण आपलाच संघ जिंकणार, असा दावा करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील आकडेच सांगतात, की पाकिस्तानमधले टीव्ही यावर्षी पुन्हा एकदा फुटणार आहेत.त्यामुळे सर्वाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून पाकचा पराभव
भारताच्या जुन्या संघा व आताच्या संघात खुप फरक आहे.जुनी आकडेवारी पाकिस्तान संघाच्या बाजुने जरी असली तरी या चॅम्पियन ट्रॉफीचा विचार जरी केला तरी भारतीय संघाने पराभवा नंतर जो दणदणीत विजय साजरा केला.तसेच बांगलादेश बरोबर झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजानी केलेली फलंदाजी यामुळे भारताची बाजू मजबुत दिसत आहे.त्याचबरोबर सर्व संघ एका सुत्रात असल्याने भारताचे पारडे जड दिसत आहे.या ट्रॉफीत भारताने आपली विजयाची सुरवात पाकिस्तान संघाला पराभूत करून केली होती. या सामन्यात अगोदर भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजी धुलाई केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. ताजे खेळातील स्थिती महत्वाची आहे.जुने काहीही असले तरी त्यावर भविष्य ठरवित असले तरी भारताने अनेक वेळा पाकिस्तानाला धुळ चारली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील हे ताजे उदाहरण यासाठी महत्वाचे आहे, कारण तेच खेळाडू पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वीचे विक्रम काहीही सांगत असले, तरी आता परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गेल्या सामन्यातील पराभवाचा दबावही पाकिस्तानवर असेल. येते. या दोन्ही टूर्नामेंटमध्ये गेल्या 4 सामन्यांमध्ये भारतानेच विजय मिळवला आहे.