नवी दिल्ली: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याने काही दिवसांपूर्वी भारतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, तर भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्याची चांगली संधी मिळेल असे वक्तव्य केले होते. त्यावरून मोदींवर टीका होत आहे. दरम्यान मोदींवर टीका करतांना आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या कॅम्पवर आयएसआयला मोदींनीच हल्ला करुन दिला. पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत असा आरोप केला आहे. दक्षिण गोवा येथे आपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला.
निवडणुकीपूर्वी भारतामध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. या घटना निवडणुकीपूर्वी घडवल्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात नक्की काय चाललय? हे काही समजत नाही. निवडणुकीपूर्वी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याबाबत केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.