जळगाव। भारताने पाकिस्तानवर सर्जिकलस्ट्राई केले होते. सर्जिकल स्ट्राइकमुळे भारत व पाकिस्तान यांच्यातील वातावरण तापले होते. या वातावरणातच चुकुन पाकिस्तानच्या हद्दीत चंदु चव्हाण या जवानाने प्रवेश केला. हा जवान धुळे येथील रहिवासी असुन तो मुळचा पाचोरा तालुक्यातील सामरोद येथील आहेे. तीन महिन्यानंतर त्यांची पाकिस्तानने सुटका केली. पाकिस्तानच्या ताब्यात असतांना बितलेल्या प्रसंगाचे कथन खुद्द चंदु चव्हाण यांनी केले आहे. रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे गणपतीनगरातील रोटरी भवनात चंदू चव्हाण यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. सर्जिकलस्ट्राइकनंतर वातावरण तापलेले असताना भारताने माझ्या सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणला होता. पाकिस्तान माझी सुटका करणार, हे तेथील माध्यमे आणि काही लोकांना सहन न झाल्यामुळे माझ्याविरोधात त्यांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या. माझे वरिष्ठांशी भांडण, केल्याचे सांगितले.
जीवनातील सर्व प्रवासाचे केले कथन
जम्मूतील त्या प्रदेशात माझी 10 दिवसांपूर्वीच नेमणूक झाली होती. सर्जिकल स्ट्राइकनंतर सीमेच्या दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू झाला होता. पाऊण तास चाललेल्या फायरिंगमध्ये मी जंगलात भरकटलो. रस्ता शोधत असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी मला हेरले. तेथून तोंडावर कापड बांधूनच ते मला दुसरीकडे घेऊन गेले. सातत्याने जागा बदलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तेथे माझ्यासह अन्य कैद्यांनाही मारहाण केली जायची. तेथे असलेले कैदी हिंदू देवदेवता, अल्लाहचे नाव घेऊन प्रार्थना विनवण्या करायचे, कुणी जोरजोरात किंकाळायचे. मानसिक संतुलन बिघडलेले अनेक जण तेथे जोरात गाणी म्हणायचे. तेथे काहीही विचारले जात नव्हते. केवळ मारहाण, त्यानंतर उपचार करायचे इंजेक्शन देऊन सोडून द्यायचे, असे सांगण्यात आले आहे.