पाकिस्तानात जीओ न्यूज वर बंदी

0

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील जीओ न्यूजला काही दिवसांपासून ब्लॅक आउटचा सामना करावा लागत आहे. सरकार आणि सैन्याच्या विरोधात बातम्या दाखवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचले असून अजूनही चॅनल ऑन एअर करण्यात आलेले नाही. पाकिस्तानातील जवळपास 80 टक्के परिसरात चॅनलचे प्रसारण बंद आहे, अशी कबुली नेटवर्कच्या मुख्य संपादकांनी दिली. अशाप्रकारचे पाऊल म्हणजे मीडियावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. अद्याप पाकिस्तानच्या लष्कराकडून यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.