नवी दिल्ली – ईश्वरनिंदा केली म्हणून पाकिस्तानमध्ये एका विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात बोलताना नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने पाकिस्तानवर टीका केली आहे. पाकिस्तानी लोकच देशाचे आणि इस्लामचे नाव खराब करत असल्याची टीका तिने केली आहे. पाकिस्तानी लोकांच्या या अशा वागण्यामुळेच देशाचे आणि इस्लामची प्रतिमा डागाळली आहे, असेही तिने म्हटले.
इस्लामबद्दल इतर लोकांना अकारण भीती आहे असे आपण नेहमी म्हणतो. तसेच पाकिस्तानला इतर देशातील लोक नाव ठेवतात अशी तक्रारदेखील आपण करतो. परंतु, पाकिस्तानची प्रतिमा दुसरे कुणी खराब करत नसून आपल्याच देशातील काही लोक खराब करत असल्याचे तिने म्हटले.