पाकिस्तानी महिला सुषामांना म्हणाली, तुम्ही आमच्या पंतप्रधान हव्या होत्या! 

0
नवी दिल्ली | सोशल मीडियावर मदत मागणाऱ्याला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना यावेळी हिजाब आसिफ नामक पाकिस्तानी महिलेने भरभरून दाद दिलीय. सुषमा यांच्या ट्विटला उत्तरात तिने म्हटलेय, की तुम्ही आमच्या पंतप्रधान असत्या तर आमचा हा देश बदलून गेला असता.
हिजाब असिफ हिने मेडिकल व्हिसासाठी सुषमा यांना साद घातली होती. तिच्या नातेवाईकावर तातडीने यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. पाकिस्तानातील कुणीही डॉक्टर ही शस्त्रक्रिया करायला तयार नाही. भारतात गुरुग्रामच्या हॉस्पिटलमध्ये ती शस्त्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे असिफने सुषमा यांना ट्विट केले. त्यावर सुषमा यांनी तात्काळ इस्लामाबादमधील भारतीय राजदूतावासाला निर्देश देऊन संबंधित पाकिस्तानी व्यक्तीला भारताचा व्हिसा देण्यास सांगितले. त्यामुळे ही महिला कमालीची प्रभावित झालीय. त्या भारावलेल्या अवस्थेत तिने आभाराचे अनेक ट्विट केले.
काय म्हटलेय ट्विटमध्ये किंवा काय आहे ट्विट 
तुम्हाला इथून खूप सारे प्रेम, शुभेच्छा आणि सन्मान. मी आपणास काय म्हणू? सुपरवूमन की भगवान? खरेतर आपल्या उदारपणाच्या वर्णनासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. लव्ह यू मॅम. माझ्या डोळ्यात अश्रू अनावर झालेहेत. तुमची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीये मी. तुमच्यासारख्या नेत्या पाकिस्तानच्या पंतप्रधान असत्या तर आमचाही देश कुठल्या कुठे गेला असता.
पाकिस्तानी सरकारबाबत..
सरताज अजीज अस्तित्वात आहेत की नाही, हेही आम्हाला माहीत नाही, इथले सरकार भ्रष्ट आहे. त्यांच्याविरोधात आम्ही पत्रकार परिषदही घेतली होती, पण ते निर्लज्ज आहेत. पाकिस्तानी जनतेच्या मनात भारताबद्दल राग किंवा द्वेष नाही, तर प्रेम आहे.