पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार;जवान शहीद

0

नौशेरा – जम्मू आणि काश्मीरच्या नौशार जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. आज सकाळच्या सुमारास त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांवर अचानकपणे अंदाधुंद गोळीबार केला. यात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. बुधवारीही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात बीएसएफचे चार जवान शहीद झाले, तर तीन जण जखमी झाले होते.

बिकास गुरुंग (वय २१) असे या जवानाचे नाव आहे. तो खुनका खुकी गावचा रहिवासी होता. बीना मे गुरुंग असे त्यांच्या आईचे नाव आहे. विशेष म्हणजे ईद-उल-फित्र हा मुस्लीम सन स्वर्त्र सुरू असतानाच पाकिस्तानी सैनिकांनी हे नापाक कृत्य केले आहे. त्यांनी नौशार भागातील लाम या गावात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.