इस्लामाबाद : १६ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अटक केली आहे. देशाच्या समुद्री सिमांचे उल्लंघन केल्याने ही अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या किनारपट्टीचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय मच्छिमारांच्या ३ बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे दाखल करण्यात आले आहे.