दुबई : क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नेहमी चुरस असते. परंतु यावेळी, क्रिकेटच्या मैदानाबाहेर या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये कायदेशीर प्रकरणांच्या विरोधात सामना होता. यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठा विजय मिळविला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विवाद निवारण मंडळाने बीसीसीआयच्या विरोधातील पीसीबीने दाखल केलेला 447 कोटी रुपयांचा भरपाईचा दावा फेटाळून लावला आहे. या बीसीसीआयच्या मोठ्या विजयामुळे दीर्घ काळचा विवाद निकाली निघाला आहे.
पीसीबीने भारतीय क्रिकेट बोर्डावर द्विपक्षीय मालिका (एमओयू) संबंधित संमती पत्र मान्य न करण्याचा आरोप केला होता. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर पोस्टवर लिहिले आहे की, वाद-विवाद समितीने बीसीसीआयच्या विरोधात पाकिस्तानचा खटला रद्द केला आहे. हा निर्णय बंधनकारक असल्याचे म्हंटले आहे.