नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान सध्या सीमावाद सुरु आहे. त्यात पारंपारिक शत्रु असलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्याही अधुनमधुन सुरुच आहेत. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त म्हणत सुरुवातीपासुनच पाकिस्तान चीनच्या ‘गुड बॉक्स’ मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात आता एका नव्या वृत्ताने खळबळ माजविली आहे. यानुसार चीनने एक ब्लू प्रिंट तयार केली असून त्यानुसार पाकिस्तान येत्या 20 वर्षांत चीनचा गुलाम बनेल, अशी रचना करण्यात आली आहे.
भारत हा दोघांचा सामायिक दुश्मन असल्याने भारताला त्रास देण्यासाठी या दोन देशांनी चंग बांधला आहे. मात्र असे असले तरीही चीनने तयार केलेली ब्लू प्रिंट पाकिस्तानच्या अडचणी वाढवू शकते. मात्र पाकिस्तान भारताला त्रास देण्यासाठी अक्षरशः चीनचे पाय चाटायलाही तयार झाला आहे असेच सद्यस्थिती सांगते आहे. ‘चीनने पाकिस्तानसोबत हातमिळवणी करून एक ब्लू प्रिंट तयार केली आहे जी मान्य झाल्यास हळूहळू पाकिस्तान चीनचा गुलाम होणार हे उघड आहे. चीननं मांडलेल्या ब्लू प्रिंटमधले हे मुद्दे सध्या समोर आले आहेत, अशा अटी जर असतील तर निश्चितच पाकिस्तान स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतो आहे यात शंका नाहीये. भारताचे नुकसान करून घेण्यासाठी पाकिस्तानला एवढी लाचारी पत्करणेही मंजूर दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात जर पाकिस्तानवर चीननं कब्जा केला तर आश्चर्य वाटायला नको.
काय आहे चीनच्या ब्लू प्रिंटमध्ये?
पाकिस्तानने त्यांची 6 हजार 500 एकर जमीन चीनला भाडे तत्त्वावर द्यावी. या जमिनीवर चीनमधील कंपन्या शेती करतील आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणतील, 35 अरब डॉलरची गुंतवणूक करून 17 पॉवर प्रोजेक्ट तयार केले जातील, चीनमधला कापड उद्योग पाकिस्तानमध्ये आणला जाईल, बलुचिस्तान आणि खैबर या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणींवरही चीनची नजर, पाकिस्तानमध्ये चीनच्या नागरिकांना व्हिसा लागणार नाही, पाकिस्तानी शहरांवर चीनच्या तांत्रिक यंत्रणेची नजर राहणार.