‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीचा नक्षलवाद्यांशी संबंध !

0

बंगळूर: काल गुरुवारी बंगळुरूमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात सुरू असलेल्या रॅलीदरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे भाषण सुरू असताना एका तरुणीने व्यासपीठावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. या तरूणीचे नाव अमूल्या लियोना असे आहे. तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी या तरुणीचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे उघड झाले असून त्याला कडक शिक्षा होईल असे सांगितले आहे. तरुणीने केलेल्या सोशल मीडियातील पोस्टवरून तिचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे उघड होते असे कर्नाटकचे गृहमंत्री यांनी म्हटले आहे.