‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; तरुणीला १४ दिवसाची कोठडी !

0

बंगळूर: काल गुरुवारी बंगळुरूमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात सुरू असलेल्या रॅलीदरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे भाषण सुरू असताना एका तरुणीने व्यासपीठावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. या तरूणीचे नाव अमूल्या लियोना असे आहे. तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या तरुणीला गुरूवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आपल्या व्यासपीठावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याबद्दल ओवीसी यांनी खेद आणि निंदा व्यक्त केली आहे.