पाकिस्तान पहिल्यांदाच चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिमफेरीत

0

कार्डिफ । चॅम्पियन ट्रॉफीच्या ईतिहासात प्रथमच पाकिस्तान संघाने प्रवेश केला.हा प्रवेश त्यांनी इंग्लंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून अतिम सामन्यात प्रवेश केला. पाकने अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले आहे.त्यांनी या स्पर्धेत अंडर डॉन प्रमाणे खेळ करित मोठी मजल मारली आहे.उपात्या सामन्यात फलंदाजी व गोलंदाजी सर्वोत्तम करून त्यांनी इंग्लंडला जेरीस आणले.तर दुसरीकडे इंग्लंडच्या गोलंदाजाचा योग्य तो समाचार घेत त्याची दयनिय अवस्था करून इंग्लंडला पराभूत केले.

हसन अलीने सर्वाधिक विकेट घेतल्या
चॅम्मियन ट्रॉफीत एक बलाढ्य व सर्वे सामने जिकलेल्या संघ म्हणजे इंग्लंड होता.त्यांनी गोलंदाजी व फलंदाजीच्या जोरावर विरोधी संघाना पराभूत केले होते.या विजयरथावर बसलेल्या इंग्लंडच्या संघाला पहिल्या उपात्य सामन्यात पाकिस्तानने लोळवले. पाकिस्तानने गड्यांनी साहेबांवर अविश्वसनीय वाटणारा विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. पाक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ 211 धावा गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकच्या अझहर अली (76) आणि झमानच्या (57) अर्धशतके झळकावली. हे दोघे बाद झाल्यावर बाबर आझम (नाबाद 38) मोहम्मद हाफिजने (31) इंग्रजांना डोके वर काढू दिले नाही. शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये यजमान इंग्लंडला अवघ्या 211 धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून जो. रुटने सर्वाधिक 46 धावा तर जॉनी बेयरस्ट्रोने 43 धावा काढल्या. हसन अलीने मोर्गन, स्टोक्स यांच्या विकेट घेत, चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक 10 विकेट घेणारा तो पाकिस्तानी गोलंदाज बनला.