पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी

0

संयुक्त राष्ट्र संघ । आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणात दिलेली चपराक आणि त्यानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने चौक्या उध्वस्त केल्यावरही पाकिस्तानला शहाणपण सुचलेले नाही. आता तर निंयत्रण रेषेवर भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या वाहनांवर भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचा कांगावा पाकिस्तानने केला होता. मात्र बुधवारी रात्री संयुक्त राष्ट्र संघानेच हा दावा फेटाळल्यामुळे भारताविरोधात नेहमीच कांगाळ्या करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडला आहे. भारतीय सैन्याने खंजर सेक्टरमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या निरीक्षकांच्या वाहनांवर गोळीबार केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी पाक लष्कराच्या जनसंपर्क विभागाचा हवाला देत दिले होते. भारतीय सैन्याच्या या आगळीकीला पाकिस्तानी सैन्यानेही गोळीबार करत उत्तर दिल्याचे या वृत्तात म्हंटले होते. पण बुधवारी लगेचच संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रवक्त्याने या वृत्ताचे खंडन केले. प्रत्यक्षात असे काही घडलेले नाही, असे या प्रवक्त्याने सांगितले.

गोळीबाराचे आवाज
संयुक्त राष्ट्र संघाच्या निरीक्शकांचे एक पथक पाकिस्तानातील भीमबेर जिल्ह्यात गेले होते. या दौर्‍यात त्यांच्यासोबत पाकिस्तानी लष्कराची वाहने देखील होती. या दौर्‍यादरम्यान, या परिसरात गोळीबारचे आवाज ऐकायला मिळाले. हा गोळीबार संयुक्त राष्ट्र संघाच्या पथकाला लक्ष्य करण्याच्या हेतूने झाला असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही तसेच या गोळीबारात कोणी जखमीही झाले नसल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रवक्त्याने सांगितले.