पाकिस्तान म्हणजे टेररिस्तान

0

जिनिव्हा । ज्या देशाच्या नावाचा अर्थ पवित्र भूमी असा होतो, तो देश आज दहशतवाद्यांची भूमी बनला आहे. एका अपयशी, पराभूत देशाने आम्हाला मानवाधिकार आणि लोकशाहीचे धडे शिकवू नयेत. पाकिस्तान म्हणजे मटेररिस्तानफ असून तेच जगभरात दहशतवाद पसरवत आहेत, असा मसर्जिकल स्ट्राइकफ भारताने आज संयुक्त राष्ट्रसंघात केला.

अखंडतेचा भारताचा निर्धार
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार, सीमेपलीकडून कितीही दहशतवादी कारवाया झाल्या, तरी भारताची एकता आणि अखंडता कायम राहील, असा निर्धारही भारताने व्यक्त केला. काश्मीरमधील नागरिकांचा संघर्ष चिरडण्याचे काम भारत सरकार करत असून पाकमध्ये दहशतवादही पसरवतंय, अशा मउलट्या बोंबाफ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी यूएनच्या महासभेत मारल्या होत्या. काश्मीरमध्ये विशेष दूत नेमण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याला भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी दूतावासाच्या प्रथम सचिव एनम गंभीर यांनी राइट टू रिप्लाय अंतर्गत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानातील राज्य कर्ते अनेकदा अंतराष्ट्रीय व्यासपीठावरही तोंडघशी पडल्यावरही दहशतवादाला खतपाणी दिले. जात असल्याचे मान्य करीत नाहीत. त्यामुळे या दहशतवादी हिंसाचाराचा त्रास सहन करणार्‍या भारताला आपली बाजू सक्षम असूनही मुसद्देगीरी व संघर्ष टाळण्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानला सुधारण्याची संधी द्यावी लागते. मात्र आता अन्य देशांच्या लक्षात पाकिस्तानच्या खेळ्या आल्या आहेत.