घाटकोपर । गणेश विसर्जनाचा मुहूर्त आणि गर्दीचा फायदा घेत काल दिनांक 5 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास राजकुमार संतराम यादव ( वय 20 ) राहणार मुलुंड. यादव दुपारी 2 वाजताच्या सुमारास कल्याण ट्रेन पकडत कुर्लाहून मुलुंड मार्गे जात असताना रेल्वेत असलेल्या गर्दीचा फायदा घेत साकिब समिब हुंमतखान ( वय 19 ) याने यादव यांचे पैशांचे पाकीट चोरण्याचा प्रयत्न केला असता दरम्यान रेल्वेत असलेल्या एका दक्ष नागरिकांच्या आरडाओरडामुळे चोर प्रवाशांच्या जाळ्यात फसला. यावेळी यादव यांनी आरपीएफ घाटकोपर पोलिसांना याची माहिती देत आरपीएफचे पोलीस निरीक्षक ब्रिजेश कुमार यांनी तात्काळ आपल्या अधिकार्यांसह चोरास ताब्यात घेतले . आरपीएफ पोलिसांनी आरोपीवर 1488 ( 17 ) कलम 379 अन्वये चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.