पाचंबा येथे रोहयो अंतर्गत बंधाऱ्यातुन गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात

0

नवापूर:तालुक्यातील पाचंबा येथे महाराष्ट्र ग्रामीण हमी योजने अंतर्गत गावाजवळील बंधाऱ्यातुन गाळ काढणे कामाचा शुभारंभ आ. शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पाचंबाचे सरपंच गोरजी गावित, गेमजी वळवी, रमेश वळवी, वासदाचे सरपंच सुनील वसावे, चेडापाडाचे सरपंच अकुश वसावे, राजु वसावे,माजी पं.स.सदस्य जालमसिंग गावित, विस्तार अधिकारी किरण गावित, दिलीप कुंवर, ग्रामविकास अधिकारी जी.आर.पाटील,आदी उपस्थित होते.

पाचंबा गावाजवळील बंधाऱ्यातुन गाळ काढण्यासाठी १४० मजुरांना काम मिळाले आहे. याप्रसंगी आ. शिरीषकुमार नाईक यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामाच्या शुभारंभ केला. प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेेची कामे जोरात सुरु अाहे. मजुराना पैसे मिळतात की नाही ? काय रोज मिळतो आहे? याची विचारणा आ. नाईक करीत असतात. यावर्षी रोजगार हमी योजनेचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असुन पुढील काळात शेतकऱ्यांंना या कामांचा फायदा होणार आहे.

आदिवासी भागात आनंद

नवापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेचे ९ हजार १० मजुर काम करीत आहे.लाँकडाऊनच्या काळात काम मिळाल्याने नवापूर तालुक्यातील आदिवासी भागात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.