जळगाव । महापालिकेच्या मुदत संलपेल्या 18 मार्केटमधील सुमारे 2175 गाळेधारकांकडे महापालिकेचे गेल्या चार वर्षाचे भाडे थकले आहे. थकीत भाड्यांवर पाचपट दंडासह नोटीसा देखील महापालिकेने गाळेधारकांना दिलेल्या आहेत. पाचपट दंडाच्या ठरावाला स्थगिती देवून त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. यात नगरविकास प्रशासनाने पाचपट दंड रद्द करुन त्याऐवजी दरमहा 2 टक्के व्याज आकरणी करण्याची टीप्पणी नगरविकास मंत्र्यांकडे ठेवली असल्याचे वृत्त आहे.
मनपा, व्यापार्यांची ऐकली बाजू
महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 मार्केटमधील 2175 गाळेधारकांकडे थकीत असलेले भाडे व त्यावर पाचपट दंडाच्या नोटीसा ठराव क्रमांक 40 प्रमाणे किरकोळ वसुली विभागाने बजावल्या आहेत. सुमारे तिन वर्षांची(2012-13,2013-14,2014-15 )बिले व त्यावर पाचपट दंड अश्या त्या नोटीसा आहेत. त्यानतंरच देखिल एक वर्ष झाल्याने आता चार वर्षाचे भाडे मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे थकले आहे. या भाड्यावर ठराव क्रमांक 40 नुसार पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर गाळेधारकांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज केल्यावर या ठरावाला स्थगिती देण्यात आली होती. यावर नुकतीच सुनावणी होवनू महापालिका व व्यापारी यांची बाजू एकून घेण्यात आली. यावर निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार शासनाने पाचपट दंड रद्द करुन त्याऐवजी कायदेशीर दरमहा 2 टक्के व्याजाची आकारणी करण्याची शिफारस ठेवली आहे.