पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ होणार

0

मुंबई : शैक्षणिक प्रकल्प राबवण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळाची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. यामध्ये पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 9 प्रकारांमध्ये 20 रुपये इतकी अत्यल्प शिष्यवृत्ती मिळत होती. वार्षिक किमान 240 रुपये आणि दोन प्रकारांमध्ये 100 रुपये प्रति महिना असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप होते. मात्र आता या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केला आहे. यात सर्व 11 प्रकारच्या शिष्यवृत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली असून शिष्यवृती रकमेव्यतिरीक्त प्रति विद्यार्थी वार्षिक रक्कम 750 रुपये बालभारतीमार्फत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 32 हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.