चाळीसगाव । पुणे येथील शिक्षण परीषद विभागातर्फे रविवारर 26 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी राज्यात परीक्षा घेण्यात आल्या. यात मात्र पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना अजब-गजब प्रकार अनुभवाला सामोरे जावे लागले. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीच्या घेण्यात आलेल्या परीक्षेकरिता अर्ज भरताना मराठी माध्यम नोंदवण्यात आले होते. परंतु गणित विषयाचा पेपर मराठी भाषेऐवजी इंग्रजीतून मिळाल्याने शहरातील गुडशेपर्ड शाळेच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला होता. याबाबत केंद्राध्यक्षांनी प्रश्नपत्रिका बरोबर असल्याचे सांगितलेे, तर या संदर्भात गटशिक्षणाधिकार्यांकडे विचारणा केली असता त्यांनीही अंग झटकत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले.
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालकवर्गाकडून संताप
विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर सेमी मराठी असल्याने त्यांना देण्यात आलेली प्रश्नपत्रिका ही बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी गटशिक्षणाधिकारी परदेशी यांना विचारणा केली असता त्यांनी या बाबत अंग झटकले. दरम्यान, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा शहरातील गुडशेपर्ड अकॅडमी येथे घेण्यात आली. डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी या वेळी बसले होते. परंतु, परीक्षा अर्ज भरताना हॉल तिकीटवर त्यांनी मराठी माध्यम भरले होते. परंतु, विद्यार्थ्यांना पहिला पेपर मराठी भाषेतून देण्यात आला; मात्र गणिताचा पेपर इंग्रजी भाषेतून मिळाल्याचे पालकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. ऐनवेळी इंग्रजी पेपर मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांची धांदल उडाल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.
गटशिक्षणाधिकारीसह मुख्याध्यापकांना धरले धारेवर
यासंदर्भात पालकांनी गटशिक्षणाधिकारी परदेशी, मुख्याध्यापक वाबळे यांना जाब विचारला. मात्र, त्यांनीही समाधानकारक उत्तरे दिले नसल्याची प्रतिक्रिया या वेळी पालकांनी व्यक्त केली. यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर डॉ. अर्चना पाटील, दीपक पाटील, विजय पाटील, योगिता चव्हाण, रत्नप्रभा पाटील, चिंतामण वाघ, अशोक पाटील, प्रशांत पाटील, दीपाली पाटील, मनीषा देवरे, सतीश पाटील, प्रशांत पाटील, संजय महाजन, योगेश पाटील, सतीश पवार, राधा देशमुख, दीप्ती पिंगळे, मनीषा चौधरी, उज्ज्वला पवार, दीपाली खैरनार, सविता बैरागी, ललिता पाटील, वैशाली बोरसे, उषा पाटील, माया गुंजाळ, रंजना पाटील, अनिता मोरे, सीमा शिसोदे, सुवर्णा पाटील, ज्योती परदेशी, नितीन खैरनार, रेखा कोळी यांच्यासह अनेक पालकांच्या स्वाक्षर्या आहेत.