पाचव्या गंभीर जखमीचाही मृत्यू

0

जळगाव । 7 जानेवारी रोजी रात्री 9.15 वाजता दोन केमिकलचे मिश्रण प्रमाणापेक्षा जास्त गरम झाल्यामुळे कँटलमध्ये दाब वाढून गीतांजली केमिकल या कंपनीत स्फोट झाला होता. या स्फोटात एकूण 10 कर्मचारी जखमी झाले होते. यातील पाच जखमी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यातील चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी पाचवा गंभीर जखमी कामगार धनराज शालीक ढाके यांचा देखील मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.