जळगाव । वाघुर येथून येणारे पाणी गिरणा टाकी येथे पाच टाक्यांमध्ये साठवले जाते. तेथून वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जातो. या साठवण टाक्यांची अनेक वर्षात स्वच्छता करण्यात आलेली नाही. या टाक्या उघड्या असून त्यात शेवाळ झाले आहे. काही टाक्या ब्रिटीशकालीन असून त्यांना तडे गेले आहेत. उमहापौर ललित कोल्हे यांच्यासह पदाधिकारी यांनी या टाक्यांची पाहणी केली. यावेळी लाखो जळगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने टाक्या साफ करुन त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना उपमहापौर कोल्हे यांनी अधिकार्यांना दिल्यात.
टाक्या कचरा आणि अस्वच्छतेच्या विळख्यात टाक्या
शहरातील जलकुंभांमध्ये अस्वच्छता असल्याने दुषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमहापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर सुनिल महाजन, माजी स्थायी सभापती नितिन बरडे, नगरसेवक अनंत जोशी, पाणीपुरवठा अभियंता डि.एस. खडके यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जलसाठा असलेल्या पाचपैकी चार टाक्या मोडकळीस आल्या आहेत. या चारही टाक्यांमध्ये तब्बल एक कोटी अडीच लाख लीटर पाण्याचा साठा केला जातो. या टाक्या कचरा आणि अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहेत.
झाकणच नसल्याने टाकीचा भाग उघडा
निम्म्यापेक्षा अधिक शहरास पाणी पुरवठा करणार्या येथील या चारही टाक्या घाणीच्या विखळ्यात सापडलेल्या आहेत. टाक्यांच्या आजूबाजूला कचरा व झुडपे वाढली आहेत. त्यात जनावरांचा मुक्त संचार असतो. या परिसरात कित्येक वर्षांपासून गवतही काढण्यात आलेले नाही.खालच्या टाक्यांवरील स्लॅबही नाहिसा झालेला आहे. झाकणच नसल्याने टाकीचा भाग उघडा पडला आहे. त्यात गंजलेल्या सळया, कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पॉलिथिनच्या बॅग्ज पडलेल्या आहेत.
अप्पासाहेब सुखदेवराव यादव जलकुंभातून कनेक्शन चुकीचे केल्याने मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे उपमहापौरांच्या पाहणीत आढळून आले. जमिनीवरील टाक्यांवरील स्लॅब पाण्यात कोसळला आहे. टाक्याजवळ प्रभाग समितीचे आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय आहे. या टाक्यांना पर्याय करण्याच्या सूचना देखिल उपमहापौर कोल्हे यांनी दिल्या आहेत. या टाक्यांच्या सुरक्षेसाठी कुठलीही व्यवस्था नाही. काही भागातील तारांचे कुंपण कापून काढण्यात आले आहे.
रजिस्टर तपासले
गिरणा टाकी, खोटे नगरसह शहरातील सर्व टाक्या यापुढील ड्राय डे च्या दिवशी एक एक करुन साफ करण्याच्या सूचना अधिकारी यांना देण्यात आल्यात. तसेच 5 वर्षापूर्वी या टाक्या कधी साफ करण्यात आल्या होत्या त्याचे रजिस्टर देखिल मागविण्यात आले. उपमहापौर व त्यांच्या पथकांने पाहणीनतंर टाक्यांची परिस्थीतीची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांना दिली. टाक्यांची नियमित सफाई करणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत अशी प्रतिक्रीया महापौर नितिन लढ्ढा यांनी व्यक्त केली. तसेच लागलीच टाक्या दुरूस्तीच्या सुचना केल्या