पाचोरा अतिक्रमणधारक संदर्भातील उपोषणाची सांगता

0

तहसीलदारांनी लिंबू पाणी देऊन सोडले उपोषण

पाचोरा । शहरातील पिढीत अतिक्रमण धारकांना लोडगाडीवर रहदारीला अडथळा होणार नाही अशी परवानगी द्यावी, या मागणीसाठी व अतिक्रमण काढतांना भेदभाव केला आदी मागण्यांसाठी सुरू केले होते तहसीलदार यांनी आश्वासन दिले त्यामुळे उपोषणाची सांगता झाली. येथील प्रांताधिकारी कार्यालया समोर लोडगाडीवर रहदारी ला अडथळा होणार नाही अशी परवानगी द्यावी, आर.टी.ओ.ला अपघातात चौकशी करून कारवाई करावी, पाचोरा शहरातील अतिक्रमण काढतांना जो भेदभाव झाला यात गरिबांचे काढले मात्र धनदांडग्यांचे अतिक्रमण जैसे थे परिस्थिती आहे त्यामुळे हा भेदभाव का? याची चौकशी व्हावी, न.पा. फंडातून बांधकाम करून पिढीत अतिक्रमण धारकांना प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी काँग्रेस आयचे आरोग्य सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

तीन दिवसांपासून सुरू होते उपोषण
आज त्यांच्या उपोषणाची दखल पोलीस विभागाच्या गुप्तचर विभागाने देखील घेतली होती. तिन दिवस उपोषण सुरू होते. मुख्याधिकारी किरण देशमुख हे उपोषण सुरू असतांनाच मुख्यालय सोडून मुंबई बैठकला गेले होते. त्यामुळे अखेर तहसीलदार बी.ए. कापसे यांनी शोकॉस नोटीस त्यांच्या सह आर.टी.ओ. विभागाला दिली होती. अखेर नगरपालिका उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील व ग्रामसेवक पी.आर.पाटील यांनी लेखी स्वरूपात दिल्यावर तहसीलदार बी.ए.कापसे यांनी शरबत देऊन सचिन सोमवंशी यांचे उपोषण थांबवले. यावेळी पालिका उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी कार्यालयाचे शिरस्तेदार, सभापती सुभाष पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य दत्ता पाटील, जि.प. सदस्य मधुकर काटे, नंदु सोमवंशी, प्रदीप पाटील, साहेबराव पाटील, नशिरसेठ बागवान, सुनील पाटील आदी उपस्थित होते.